खवशी येथे मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप.
![]()
खवशी येथे मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप.
अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)
खवशी येथे मूळचे येथील रहिवासी कै. विजय नारायण पवार (विकासअधिकारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी) हल्ली राहणार कोसंबा जिल्हा सुरत गुजरात राज्य यांचे स्मृती प्रित्यर्थ श्रीमती. शर्मिष्ठा विजय पवार (निवृत्त जीएसटी कमिशनर गुजरात राज्य) यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक वाटप केले. मागील वर्षापासून त्या हा उपक्रम राबवत आहेत. याचबरोबर समाजातील महिलांना साडी वाटपाचा उपक्रम पण राबवत असतात.
यावेळी आविष्कार पवार, आयुष पवार, प्रांजल पवार, राजरत्न पवार , प्रशिक पवार, करिष्मा पवार ,करीना पवार, कावेरी पवार, निकिता पवार, नम्रता पवार , निर्वाण पवार ,यश शिरसाठ, प्रणिती शिरसाट ,गौरव वाघ, हितेश वाघ, दिवेश मोरे, खुशी सोनवणे, दिव्या सोनवणे आदी विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील सर्व स्तरात वरून श्रीमती शर्मिष्ठा पवार यांचे कौतुक होत आहे. त्यांनी यापूर्वीही स्वखर्चातून खवशी येथील रमाई नगर भागात भव्य असे प्रवेश द्वार उभे केलेले आहे.

