३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार ,अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित
![]()
३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार
अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित
अमळनेर, प्रतिनिधी :
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. वासुदेव वत्सला रामभाऊ देसले हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय शासकीय सेवेनंतर दि. ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अमळनेर येथील इंदिरा भवन, स्टेशन रोड येथे भव्य शासकीय सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. प्रतापराव दिघावकर (आयपीएस), विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र हे राहणार आहेत.
समारंभाला जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, साहेबराव पाटील, शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप सोनवणे, अशोक आधार पाटील, संभाजी लोटन पाटील, तसेच मा. मुख्याध्यापक यू. ओ. चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. वासुदेव देसले यांनी पोलिस सेवेत कार्यरत असताना कर्तव्यनिष्ठा, शिस्त, जनसंपर्क आणि प्रशासनातील कार्यक्षमतेच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या दीर्घ सेवेला कृतज्ञतेची मानवंदना देण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमानंतर दुपारी १२.३० वाजल्यापासून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार समारंभाचे आयोजन सौ. सुषमाताई देसले-पाटील (संचालिका, शेतकरी सहकारी संघ अमळनेर, संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, माजी आदर्श लोकनियुक्त सरपंच व राज्यपाल पुरस्कारप्राप्त) यांच्या पुढाकाराने दहिवद ग्रामस्थ, मित्रपरिवार व अमळनेर येथील सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले

