निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात !
![]()
निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात !
नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे)
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि. ०८ जुलै २०२६ रोजी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर/जैताणे येथील प्राध्यापक, दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार, अखिल भारतीय माळी महासंघाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष व मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुप्रसिद्ध प्राध्यापक मा. भगवान जगदाळे यांचे कनिष्ठ चि. अनुराग जगदाळे (संगीत शिक्षक, सुप्रसिद्ध मराठी सिने गायक व मातोश्री सेवाभावी संस्था संचालक) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनोख्या पध्दतीने परिसरातील तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दातृत्व भावनेतून मदतीचा हात देत असतात. यंदा ब्राम्हणवेल माध्यमिक विद्यालयातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वह्या,पेन, बिस्कीट पुडे अशा शालोपयोगी भेट वस्तू देऊन मातृसंस्थेच्या माध्यमातून दातृत्वाचा हात दिला ! सदर कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, ब्राम्हणवेल गावाचे ग्रा. प. सदस्य ,उप सरपंच मा. जगदिश शिवाजी खैरनार, चि. रितेश खैरनार या सर्व मान्यवरांचा व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मा. माळी के. एन. जेष्ठ शिक्षक श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी. एस., श्री. रविंद्र सुर्यवंशी, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे, यांनी केला. त्यासोबतच प्रमुख पाहुणे मा. प्रा. भगवान जगदाळे यांनी संस्थेचे अध्यक्ष, मा.नानासाहेब तुकाराम बळीराम माळी,सचिव मा. एकनाथ बळीराम महाजन व नवनियुक्त प्रभारी मुख्याध्यापक मा. माळी के. एन. यांचा सत्कार केला. सदर कार्यक्रमात सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. इ. १० वी च्या विद्यार्थिनीं कु. भाग्यश्री कोरे, कु.कामिनी सुर्यवंशी, कु. राशी गावीत, कु. लक्ष्मी ठाकरे यांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी उत्कृष्ट लयबद्ध स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या कडून रोख बक्षीस देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून ” बर्थडे बॉय ” सुप्रसिद्ध सिने गायक अनुराग जगदाळे यांनी आपल्या नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ” जब्राट ” या सिनेमातील स्वतः पार्श्वगायन केलेले गीत ” तू आणि मी…! ” या गाण्याची लाइव्ह गायन झलक दाखवली. त्यासोबतच अनेक हिंदी व मराठी सिने गीते गायन सादरीकरण करत आपल्या मधुर आवाजाची व गीत संगीत साधनेची ओळख पटवून देत सर्व उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मन जिंकून सर्वांना मंत्रमुग्ध करत शालेय भव्य पटांगणावर डोलावयास व तालावर थिरकण्यास भाग पाडले! सर्वच गीत गायनाला टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्व शालेय वातावरण संगीतमय झाले होते. मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून चि. अनुराग जगदाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत कौतुकाचा वर्षाव करत भविष्यात खूप मोठा गायक होण्याच्या आशीर्वाद रुपी हार्दिक शुभेच्छा दिल्या ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी केले. असा विद्यार्थी हिताचा कार्यक्रम शालेय इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणून संस्थाचालक, विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षकांच्या मनावर कायमचा कोरला जाईल!


वाह अतिशय सुंदर बातमी धन्यवाद आदरणीय संपादक साहेब!🌹🌹🌹👏👏👏👏🫡🫡🫡