अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक
![]()
अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक
अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार):
अमळनेर आगार ची गेल्या कित्येक वर्षापासून ची सुरू असलेली वेळापत्रकीय बस फेरी अमळनेर व्हाया गांधली ,अमळगाव, खेडी, खवशी, पातोंडा मार्गे नांदेड मुक्कामी जाणारी बस कोरोना काळापासून बंद करण्यात येत आहे आलेली आहे त्यामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरी ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
अमळनेर आगार ची सायंकाळी ७:००वाजता अमळनेरहुन सुटणारी व्हाया खेडी , खवशी, पातोंडा मार्गे बस नांदेड येथे मुक्कामी राहत असे. व सकाळी ६:०० नांदेडहून सुटून याच मार्गे अमळनेर परत होत असे त्यामुळे सकाळी शाळा अथवा कॉलेज आणि इतर कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर व उपयुक्त फेरी होती. मात्र ही बस फेरी बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तरी ही बस सेवा जर सुरू झाली तर सकाळी खवशी पर्यंत सुटणारी बस फेरीही वाचेल व नांदेड सह सर्व पंचक्रोशीतील प्रवासांची योग्य प्रकारे सोय होईल तरी ही बस फेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतून केली जात आहे.
तरी अमळनेर आगर प्रमुख यांनी सदर बाबीवर लक्ष देऊन अमळनेर नांदेड बस फेरी पुरवत सुरू करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतून केली जात आहे.

