गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला
1 min read

गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला

Loading

गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला

मंत्री, खासदार, आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती; दहावी-बारावी ते स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

जळगाव प्रतिनिधी :

गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी, दि. १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पेठ येथील केमिस्ट भवन येथे भव्य गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते होणार असून जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ तसेच आमदार राजूमामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महापौर दीपमाला काळे, माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार आणि नगरसेविका सौ. सुरेखा नितीन तायडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी यशवंतराव ठोसरे असतील. माजी प्राचार्य निळकंठराव गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून सेवानिवृत्त मुख्य अभियंता डॉ. राजेंद्र बाविस्कर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा क्लबचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, सचिव प्रदीप शेकोकार यांच्यासह प्रा. विठ्ठल सावकारे, धीमंत पी.आर. आंबेडकर, संजय बाविस्कर तसेच क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव परिश्रम घेत आहेत.

आयोजन समितीत अशोक भारुडे, गणेशजी सुरळकर, कैलास वाघ, निवृत्ती सूर्यवंशी, प्रा. संदीप शेकोकार, सौ. ज्योतीताई निंभोरे, सौ. छाया जयकर, प्रा. माणिक बागले, प्रा. ए.टी. चिमकर, डॉ. संपतराव वानखेडे, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, डॉ. कैलास वाघ, डॉ. गणेश भारुडे, डॉ. सुनील तायडे, डॉ. दिलीप जयकर, डॉ. प्रकाश सुरवाडे, खंडूजी पवार, केशव ठोसरे, डी.डी. ठोसरे, अरुण नेटके, सोपान भवरे, दिलीप दांडगे, युवराज घोलाणे, सुनील वानखेडे, संदीप सूर्यवंशी, सुरेश वाघमारे, सुरेश घुले, गणेश दांडगे, गणेश राऊत, स्वप्निल ठोसरे, संतोष चंदनकर, शांताराम गवळे, डी.ए. सोनवणे, रवींद्र देवरे, सुधाकर मोरे, संजय निंभोरे, अनिल वानखेडे, अशोक लोखंडे, दीपक अहिरे, प्रशांत निंभोरकर, संजय भारुडे, रामलाल ब्राह्मणे, अमोल बाविस्कर, पुरुषोत्तम चिमणकर, नितीन दांडगे, निलेश गोरे, मनोहर शेकोकार, दशरथ देशमाने, मंगल रेघे, देविदास खैरनार, अशोराज तायडे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

जिल्ह्यातील चर्मकार समाजातील सर्व विद्यार्थी, पालक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन गुरु रविदास क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *