रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न ,  वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन
1 min read

रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न , वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन

Loading

रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न

वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी :
वन महोत्सव कालावधीत “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित अमळनेर घडविण्याच्या उद्देशाने “वृक्षारोपण अभियान २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

रोटरी क्लब अमळनेर, अमळनेर नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट, पर्यावरण सखी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रो. अजयभाऊ केले यांच्या घरासमोरील खुल्या जागेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील व वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रो. अजय केले यांच्या धर्मपत्नी सौ. विनिता अजय केले यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक पद्धतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

डॉ. शिबी वशिष्ठ यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध “भाग्यश्री” या शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वृक्षांच्या वाढीसाठी भेट दिले. हे खत वृक्षांची जोमदार वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी “एक पेड मा के नाम” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केलेरो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमात रोटरी क्लबचे सदस्य विवेक देशमुख, अजय रोडगे, कीर्तिकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *