अनुदान टप्पा वाढीचा निर्णय निकाली काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील -अनिल बोरनारे  ,शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानातील आंदोलनाला अनिल बोरनारे यांनी दिली भेट
1 min read

अनुदान टप्पा वाढीचा निर्णय निकाली काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील -अनिल बोरनारे ,शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानातील आंदोलनाला अनिल बोरनारे यांनी दिली भेट

Loading

अनुदान टप्पा वाढीचा निर्णय निकाली काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील : अनिल बोरनारे

शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानातील आंदोलनाला अनिल बोरनारे यांनी दिली भेट

मुंबई:ठाणे( मनिलाल शिंपी ) – राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अनुदान टप्पा वाढीच्या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शिक्षक महासंघ मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अनिल बोरनारे यांनी राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक-कर्मचाऱ्यांचा अनुदान टप्पा वाढीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून हा निर्णय तातडीने निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. या प्रश्नाबाबत संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक असून त्यांच्या रास्त मागण्यांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात शिक्षक समन्वय संघाचे नेते खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून आलेले हजारो विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी अनुदान टप्पा वाढीचा निर्णय तातडीने जाहीर करण्याची मागणी केली.

अनिल बोरनारे यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *