व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी*
![]()
*व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी*
*सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी*
पाचोरा -जिल्हा परिषद जळगावच्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर व प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉल द्वारे शाळा तपासणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पंचायत समिती पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या कडे सामनेर, पिंपळगाव हरेश्वर, गोराडखेडे उर्दू व मराठी या चार केंद्रातील सुमारे पन्नास शाळांची जबाबदारी देण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता प्राप्त होण्यासाठी दररोज जिल्हा परिषद शाळांमध्ये निपुण तासिका घेण्यात येत आहेत. याचे निरीक्षण करण्यासाठी व्हिडीओ कॉल उपक्रम सुरु झालेला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले की सामनेर, लासगाव, बांबरुड राणीचे या शाळांना व्हिडीओ कॉल द्वारे निपुण तासाचे निरीक्षण केले, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे निश्चितच शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल. सर्व केंद्र प्रमुखांना दररोज 11 ते 12 या वेळेत शाळेला भेट देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

