दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; रामदास झोळ व माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या  रामदास झोळ अद्यापही फरार; अटकेसाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती
1 min read

दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; रामदास झोळ व माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या रामदास झोळ अद्यापही फरार; अटकेसाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती

Loading

दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; रामदास झोळ व माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या

रामदास झोळ अद्यापही फरार; अटकेसाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती

करमाळा, प्रतिनिधी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली असून रामदास झोळ अद्यापही फरार आहेत. दत्तकला शिक्षण संस्थेबाबत धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही यंत्रणांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली असून, विशेष पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन आज बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.
मनोहर भोसले आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे यापूर्वीच पोलिसांनी सांगितले आहे. मनोहर भोसले याच्याकडून मिळालेल्या कथित पैशांची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावल्याचे आणि तपासादरम्यान संस्थेच्या कामकाजातील विविध बाबींमध्ये अनियमितता आढळून आल्याचेही पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही स्तरांवरील चौकशीमुळे संस्थेच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
मनोहर भोसले हा अनिष्ट प्रथा, महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे तसेच इतर विविध गुन्ह्यांप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासातून दत्तकला शिक्षण संस्थेचा सहभाग निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
चौकट
तपासादरम्यान दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा मनोहर भोसले याच्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून संस्थेतील राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट रोजी, तर लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
त्यानंतर तिन्ही आरोपींना माढा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, पोलिसांच्या कोठडीच्या मागणीनंतर न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने माया झोळ यांच्यासह राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांचीही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन आज बार्शी न्यायालयाने फेटाळला, त्यामुळे झोळ दाम्पत्य यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. दबंग आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या अधिपत्याखाली एस आय टी स्थापन करण्यात आली आहे.
कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता रामदास झोळ यांचा भुरखा फाडल्यानुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्व सामान्य जनतेतून कौतुक होत आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *