शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गौरव*
![]()
*शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गौरव*
जळगाव : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक अधिक उंचावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच विद्यालयात स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कौस्तुभ जयवंत खैरनार व आर्य सागर राठोड यांनी यश संपादन केले. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत केतन गिरीश पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. याच परीक्षेत कु. दिशा प्रवीण पाठक आणि कु. वैष्णवी सुनील सोनवणे यांनीही शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली.
याशिवाय केतन गिरीश पाटील कु. रिया महेश पाटील व कु. दिशा प्रवीण पाठक यांनी एनएमएमएस परीक्षेत प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, श्रीमती प्रतिभा लोहार, श्री निर्मल चतुर, श्रीमती मंगला लोडते, श्रीमती हेमलता भोळे तसेच श्रीमती रत्नमाला शिंदे उपस्थित होत्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन तसेच शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्यालयामध्ये नियमित अध्यापनासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन दिले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि गुणवत्तेची जडणघडण होत असल्याचेही सांगण्यात आले.
या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व स्पर्धा परीक्षांतील यशाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

