पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत भरारी; राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान ,राज्य शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी पात्र; इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये श्रावणी भामरे राज्यात १६ वी – गुणवंतांचा शाळेत गौरव
![]()
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत भरारी; राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान
राज्य शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी पात्र; इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये श्रावणी भामरे राज्यात १६ वी – गुणवंतांचा शाळेत गौरव
अमळनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, ही बाब शाळेसह संपूर्ण अमळनेरसाठी अभिमानाची ठरली आहे.
या परीक्षेसाठी शाळेतील २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शहरी गटात उल्लेखनीय गुणवत्ता सिद्ध केली. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी आरव विठ्ठल पाटील (इयत्ता ५ वी) व श्रावणी हेमंत भामरे (इयत्ता ५ वी) यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याचबरोबर इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेतही शाळेने उल्लेखनीय यश मिळविले. विद्यार्थिनी श्रावणी हेमंत भामरे हिने राज्यात १६ वा क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तिला स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व ₹१,००० चे रोख पारितोषिक मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच यश चौधरी (इयत्ता ५ वी) यालाही स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशामागे संस्थेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, तसेच स्वाती माळी, पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही. एस. अमृतकर, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, एस. एस. पारधी आणि समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पालक, शिक्षणप्रेमी आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

