राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आप्पासाहेब वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा , माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आप्पासाहेब वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अमळनेर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अमळनेर शहर सरचिटणीस आप्पासाहेब चिंधू ओंकार वानखेडे यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास तालुक्याचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील, अमळनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रशांतदादा निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शहर कार्याध्यक्ष जाकिर शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष मकसूद पठाण, पत्रकार संदीप पाटील, अजय भामरे, हृदयनाथ मोरे, सिद्धार्थ सोनवणे, तसेच मारोतीदादा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते आप्पासाहेब वानखेडे यांचा स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी वानखेडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय कार्यात निरंतर यश लाभावे, अशा मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

