जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध , सर्व क्रीडा संचालकांच्या कार्यशाळेत कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची ग्वाही; क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या नियोजनाचे कौतुक
![]()
मुंबई विद्यापीठ सर्व क्रीडा संचालकांची कार्यशाळा संपन्न.
मुबई विद्यापीठाकडून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल, क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांचे क्रीडा क्षेत्रातील नियोजन प्रबोधनात्मक आहे:: कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी.
मुंबई: ठाणे( मनिलाल शिंपी) मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची ५ वी कार्यशाळा “श्री विठ्ठलराव जोशी धर्मदाय संस्था क्रीडा अकादमी, कासारवाडी सावर्डे डेरवण चिपळूण येथे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी,उप कुलगुरू डॉ.अजय भामरे यांचा मार्गदर्शनाखाली,बी के एल वालावलकर मेडिकल कॉलेजच्या मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, मुंबई विद्यापीठ क्रीडा समितीचे सदस्य बी एन एम कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.चंद्रकांत म्हात्रे यांचा नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची पाच दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत ३० जून ते ४ जुलै पर्यंत विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ग्राउंड ऍक्टिव्हिटी मध्ये हॉलीबॉल मॅचेस, स्पोर्ट्स ॲथलेटिक्स ग्राउंड, बास्केटबॉल बास्केट बॉल,बॅडमिंटन या विषयी प्रॅक्टिकल सह सखोल माहिती देण्यात आली, डॉ. रुपेश थोपटे यांनी योग साधने विषयी महत्वपूर्ण माहिती दिली. थेरपी ही खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तसेच डॉ.मानसी सातालकर यांनी खेळाडूच्या खेळाडूंच्या आरोग्य व फिटनेस च्या बाबतीत विशेष सखोल मार्गदर्शन केले. क्रीडा संचालकांना आपल्या महाविद्यालयातील खेळाडू व संघांची माहिती नोंदणी प्रकिया ऑनलाइन पद्धतीने सरळ आणि सोपे कसे करता येईल याबाबत संपूर्ण सॉफ्टवेअरची माहिती प्रॅक्टिकल सह श्रीमती स्मिता मनोहर यांनी सोप्या पद्धतीने सांगितली.श्री. सानंद मित्रा यांनीही खेळाडूंना आणि क्रीडा संचालक व कोचेस यांना कशाप्रकारे आपल्या खेळाचे योग्य ते प्रबोधन करण्यात येईल त्यासाठी अशा प्रकारे नियोजन करता येईल याबाबत माहिती दिली. डॉ. आनंद लुंकड यांनी महाविद्यालयीन परीक्षण व Nack प्रक्रियेतील गुणदान पद्धतीबाबत सखोल माहिती दिली. श्री.तेजस गोरडीया, श्री. प्रविण चौगुले यांनीही विशेष माहिती दिली. मुंबई विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी सर्व झोन चे नव निर्वाचित सेक्रेटरी यांची ओळख करून दिली.ओपन फोरम मध्ये क्रीडा संचालकांना स्पर्धेत सहभाग घेताना आणि स्पर्धा खेळताना खेळाडूंना ज्या समस्या येतात, त्यामध्ये खाजगी असोसिएशन चे पदाधिकारी सदस्य कोणाचेही ऐकून घेत नाहीत, यापुढे स्पर्धेचा ठिकाणी क्रीडा संचालक उपस्थित नसल्यास खेळाडूंना सहभाग घेता येणार नाही, तसेच गैरवर्तन केल्यास कॉलेज आणि क्रीडा संचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे ठरवण्यात आले.
समारोप सोहळा प्रसंगी प्रा.पांडे सर, प्रा.लक्ष्मण इंगळे, डॉ.माने सर,प्रा.शुक्ला सर,बालाजी सुरोसे प्रा.देवयानी मॅडम,दांडेकर कॉलेज पालघर चा क्रीडा संचालिका प्रा. संगिता मोरे पाटील,यांच्यासह सर्व क्रीडा संचालक यांनी आपले मत व्यक्त केले. विद्यापीठाकडून डॉ.रेड्डी यांनी यातील योग्य सूचनांची दखल घेतली जाईल व यापुढे तसे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डहाणूकर कॉलेजचे डॉ. आदित्य कुलकर्णी,विद्यापीठ क्रीडा समिती सदस्य जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रा.रोहिणी डोंबे, एसएसटी कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.राहुल अकुल, एस आय ए कॉलेज डोंबिवलीचे क्रीडा संचालक व ठाणे झोन चे सचिव प्रा.गणेश मोरे, लांजा कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.शशांक उपशेटे, गार्डियन कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.मंदार कुलकर्णी, बंट कॉलेज चे डॉ. मनोज वर्मा,
साकेत महाविद्यालय कल्याण चे क्रीडा संचालक प्रा.उमेश सोनवणे, डॉ.चंद्रकांत नाईक व रवी वर्मा, बी. के.बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व क्रीडा समिती सदस्य डॉ. यज्ञेश्वर बारगाव, प्रगती महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण इंगळे, प्रा. एकनाथ पवळे, प्रा.राजगुरू सर,यांनी विशेष परिश्रम घेतले. एम. एल म्हात्रे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच नाशिक व कोकण विभागाचे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांनी रस्ता सुरक्षा ( RSP) विषयाची माहिती देताना सांगितले की अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॅफिक अवेअरनेस जनजागृती करणे आवश्यक आहे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि त्याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षक,प्राध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून शासनाने शिक्षकांना प्रशिक्षण घेतल्यावर पोलिस ऑफिसर सारखी खाकी वर्दी घालण्याचा सन्मान मिळाला आहे,तरी जास्तीत जास्त क्रीडा संचालक बंधू भगिनींनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट मार्फत ट्रॅफिक अवेअरनेस जनजागृती करण्यासाठी सहकार्य करावे आणि आपल्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे अवलोकन करावे असे आव्हान केले.
कार्यशाळेचा कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी प्रा.मनोज वर्मा यांनी सर्व क्रीडा संचालक, आणि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

