अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शंकर नगर व संताजी नगरातील लाभार्थीना किराणा किट वाटप
![]()
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शंकर नगर व संताजी नगरातील लाभार्थीना किराणा किट वाटप
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील नगरपरिषद हद्दीतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिंपळे रोडवरील शंकर नगर आणि बाजार समिती मागील गुरुकुपा कॉलनी व संताजी नगरातील नागरिकांना जिवनावश्यक वस्तू / किराणा किट वाटप काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी करण्यात आले.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी अमळनेर शहरात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती.यात बोरी नदी व पिंपळे नाला परिसरातील असंख्य लोकांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते.त्याअनुषंगाने अमळनेर नगरपरिषद हद्दीतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या 1800 नागरिकांना जिवनावश्यक वस्तू / किराणा किट वाटप गेल्या आठवड्यात माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.मात्र काही पीडित नागरिक या मदतीपासून वंचित राहिल्याने राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे व नगरसेवक सचिन पाटील यांनी आमदारांकडे व्यथा मांडल्याने आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनास किट वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.त्याअनुषंगाने दिनांक 20 ऑगस्ट रोजी या भागातील सुमारे 250 लाभार्थीना किराणा किट वाटप करण्यात आले.
शंकर नगर येथे श्रीरंग कॉलनीत माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते 146 लाभार्थीना किट वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक सचिन पाटील व नगरसेविका सौ योगिता कापडणेकर उपस्थित होते.तर गुरुकुपा कॉलनी व संताजी नगरात नेमणूक केलेले अधिकारी आणि कर्मचारी यांनी 100 लाभार्थीना किट वाटप केले.यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,वेद राजेश पाटील व नागरिक उपस्थित होते.

