संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने
1 min read

संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने

Loading

 

संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेमुळे तसेच मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाशी संबंधित दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा. अनिलदादा पाटील यांचा दि. ७ जुलै रोजीचा वाढदिवस यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणताही जल्लोष, सार्वजनिक कार्यक्रम किंवा उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी हार-तुरे अर्पण करणे, सत्कार समारंभ, केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी तसेच इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

दुःखद घटनांप्रती संवेदना व आदर व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *