संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान
1 min read

संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान

Loading

संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी

भारतीय संत परंपरेतील विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान, शिवाजीनगर, पैलाड, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संत विचार जागरण अभियान” अंतर्गत एका प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिवाजीनगर, पैलाड येथे होणाऱ्या या कार्यक्रमात “संत ज्ञानेश्वर महाराज : जीवनकार्य” या विषयावर सुप्रसिद्ध प्रवचनकार व अभ्यासक ह.भ.प. प्रा. सी. एस. पाटील (धरणगाव) हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, अमळनेरचे अध्यक्ष श्री संदीप बाबुराव घोरपडे हे राहणार असून, अॅड. रामकृष्ण अमृत उपासनी तसेच श्री गोकुळ शंकर पाटील (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे समन्वयक दिनेश वसंतराव नाईक, कार्याध्यक्ष रमेश यशवंत पवार असून, नरेंद्र दिनकरराव निडुभि, दिलीप राजाराम सोनवणे, निरंजन रमेश पंडारे, शरद भिका पाटील आदींचे आयोजनात विशेष सहकार्य लाभत आहे. भाऊसाहेब मल्हारराव देशमुख प्रास्ताविक करतील, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मोहन मराठे करणार आहेत.

याशिवाय सी. विजया राजेंद्र गायकवाड, प्रा. डॉ. रमेश नामदेव माने, गोकुळ गोविंदा बागुल, उमेश प्रतापराव काटे, सी. भारती संजय सोनवणे, सी. सुनिता स्नाकर पाटील, मनोहर एकनाथ नेरकर आणि प्रा. बी. एन. चौधरी हे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या वैश्विक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची ही सुवर्णसंधी असून, साहित्यप्रेमी, वारकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी मित्र-परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *