निसर्ग मित्र समिती व गंगामाई महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण —
1 min read

निसर्ग मित्र समिती व गंगामाई महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण —

Loading

निसर्ग मित्र समिती व गंगामाई महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण —————————————————

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व नगाव येथील गंगामाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वन महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रेमकुमार अहिरे, महासचिव संतोषराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार पर्यावरण प्रेमी गो पी लांडगे, प्रा डॉ शेलार आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी गंगामाई महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,तर मागील वृक्षांचे संगोपन केले आहे काय याविषयी पाहणी करून समाधान व्यक्त करण्यात आले, तसेच उपस्थित शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी व वृक्ष लागवड विषयी मार्गदर्शन करण्यात आले यात निसर्ग मित्र समितीचे प्राचार्य रविंद्र पाटील ,शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर सोनवणे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी वृक्षारोपण केलेले सर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ एस आर पाटील यांनी दिली ,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्रा पावरा, निसर्ग दादा अहिरे, आदींनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *