रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त मान्यवरांचा सन्मान, वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदानाला सलाम; पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
![]()
रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त मान्यवरांचा सन्मान
वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदानाला सलाम; पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
अमळनेर | प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट (सीए) डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या आरोग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. राहुल मुठ्ठे, डॉ. कौस्तुभ वानखेडे, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. विशाल जोशी, डॉ. प्रीतम जैन, डॉ. किरण बडगुजर, डॉ. अनिल वाणी, डॉ. सौरभ जैन, डॉ. निलेश जैन या मान्यवर डॉक्टरांचा तसेच सीए आकाश वर्मा आणि कीर्ती कोठारी यांचा गौरव करण्यात आला.
कोरोना महामारीपासून आजपर्यंत रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांच्या समर्पित कार्याचा गौरव करण्याबरोबरच आर्थिक क्षेत्रात पारदर्शकता, नियोजन व मार्गदर्शन करून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट यांच्या कार्यालाही यावेळी विशेष दाद देण्यात आली.
कार्यक्रमात रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष महेश पाटील, नूतन सचिव, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, चेलाराम सैनानी, सनी कोठारी, कीर्तीकुमार कोठारी, अविनाश अमृतकर, प्रतीक शाह, विनोद थोरात यांच्यासह रोटरी क्लबचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सन्मानित मान्यवरांना शुभेच्छा देत त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


