अभिमानास्पद यश! ,  महाजन (वाघ) परिवाराचा गौरव; सौ. गार्गी महाजन यांना भारत सरकारचे डिझाइन पेटेंट
1 min read

अभिमानास्पद यश! , महाजन (वाघ) परिवाराचा गौरव; सौ. गार्गी महाजन यांना भारत सरकारचे डिझाइन पेटेंट

Loading

अभिमानास्पद यश!

महाजन (वाघ) परिवाराचा गौरव; सौ. गार्गी महाजन यांना भारत सरकारचे डिझाइन पेटेंट

अमळनेर प्रतिनिधी
महाजन (वाघ) परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे. परिवारातील श्री. उदय हिंमतराव महाजन व सौ. संगीता उदय महाजन यांच्या सुनबाई सौ. गार्गी मयुर महाजन यांनी आपल्या संशोधकांच्या टीमसमवेत उल्लेखनीय कामगिरी करत “Pharmaceutical Drug Dispensing Device” या अभिनव औषध वितरण उपकरणाच्या डिझाइनसाठी भारत सरकारकडून डिझाइन पेटेंट (Design Registration) प्राप्त केले आहे.
भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने या संशोधनात्मक डिझाइनची Design No. 495381-001 अंतर्गत 19 मार्च 2026 रोजी नोंदणी केली असून, त्याचे प्रमाणपत्र 29 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आले आहे. पेटेंटची नोंदणी वर्ग 24-04 अंतर्गत करण्यात आली आहे.
या अभिनव उपकरणाची रचना औषध वितरणाची प्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक, सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. भविष्यात आरोग्य सेवा क्षेत्रात या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याची शक्यता असून, रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरू शकते.

या संशोधन प्रकल्पात सतीश राजेंद्र बोरसे, निलेश देविदास घोंगटे, धनश्री नितीन चव्हाण, शितल कैलास पाटील, योगिनी हेमकांत विसपुते, गार्गी महेंद्र साळुंके (महाजन) आणि विशाल सुरेश बागुल यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या यशामागे संशोधकांची जिद्द, मेहनत, नाविन्यपूर्ण विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे दिसून येते. संशोधन, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा क्षेत्रात मिळवलेले हे यश केवळ महाजन (वाघ) परिवारासाठीच नव्हे, तर जिल्ह्यातील युवा संशोधकांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.
ज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा या कामगिरीतून मिळते. युवा पिढीने पारंपरिक चौकटीपलीकडे विचार करून संशोधन व नवोपक्रमाच्या क्षेत्रात पुढे यावे, असा सकारात्मक संदेशही या यशातून मिळतो.

महाजन (वाघ) परिवारातील सौ. गार्गी मयुर महाजन आणि त्यांच्या संपूर्ण संशोधक टीमचे मनःपूर्वक अभिनंदन क्षत्रिय फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ज्येष्ठ नेते दिनेश बापू माळी, माजी नगरसेवक एडवोकेट सुरेश सोनवणे, एडवोकेट प्राध्यापक नगराज माळी, साहित्यिक गोकुळ बागुल, माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन, धनूभाऊ महाजन,सेवानिवृत्त ग्रामसेवक विजय महाजन,महात्मा फुले विचार मंचाचे अध्यक्ष प्रवीण महाजन,समता परिषदेचे अध्यक्ष अमोल माळी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक खेमराज बोरसे,अतूल महाजन, धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच.एम पाटील,
विजय महाजन, शेखर महाजन, पत्रकार ईश्वर महाजन क्षत्रिय फुल माळी समाज सर्व कार्यकारणी सदस्य समाज बांधव,विविध संस्थानचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करीत
त्यांच्या पुढील संशोधन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *