कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प
![]()
कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प
यावल (प्रतिनिधी): भारताचे माजी पंतप्रधान तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. दिपक प्रमिला चंद्रकांत कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी (वर्ग-२) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, शासकीय योजनांचा प्रभावी प्रसार आणि शेतकऱ्यांशी समन्वय साधण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषी दिनाचे महत्त्व आणि स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासातील योगदानावर प्रकाश टाकला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलेश सदार आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. कार्तिक खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पावबा खंडू पानपाटील, मयुरेश संजय पाटील, गणेश विनोद पाटील, अजिंक्य पाटील, जयेश खांगर आणि अन्सारी साद फैज या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

