कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव
1 min read

कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव

Loading

कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव

नाशिक : प्रतिनिधी – नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) वासुदेव देसले यांचा सेवापूर्ती निमित्ताने अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आयोजित विशेष समारंभात जलसंपदा व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगतात देसले यांनी पेठ–त्र्यंबकेश्वर विभागात अत्यंत प्रभावी, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख कामकाज करून पोलीस दलाचा लौकिक उंचावल्याचे गौरवोद्गार काढले.

या सन्मान सोहळ्यास नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त श्री. गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) श्री. येनपुरे, पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, प्रांताधिकारी श्री. दत्ता तसेच तहसीलदार गणेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी वासुदेव देसले यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध सेवेला सलाम करत त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *