सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा , वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव
1 min read

सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा , वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव

Loading

सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा

वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी :
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत निःस्वार्थ योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून समाजापुढे प्रेरणेचा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात वैद्यकीय, आर्थिक, कृषी आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट तसेच प्रगतशील शेतकरी बांधवांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख होते. यावेळी सचिव जयेश गुजराथी, खजिनदार कुमारपाल कोठारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी समाजाप्रती निष्ठा, सेवाभाव आणि कर्तव्यदक्षतेच्या भावनेतून केलेले कार्य हेच समाजाच्या प्रगतीचे खरे बळ असल्याचे सांगितले. सन्मानित व्यक्तींचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. संदीप जोशी, डॉ. मिलिंद नवसारिका, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. किशोर शाह, डॉ. युसुफ पटेल, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. रवींद्र जैन, डॉ. निखिल बहुगुणा, सीए राजेश शाह, सीए अजय हिंदुजा, सीए रुपेश मकवाणा तसेच प्रगतशील शेतकरी एच. डी. भरुचा, सुशील जैन, योगेश मुंदडा, सुनील चौधरी, प्रितेश पारख, जितेंद्र जैन आणि दिनेश मणियार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी केले. सूत्रसंचालन अजय हिंदुजा यांनी केले, तर आभार सचिव जयेश गुजराथी यांनी मानले. डॉ. किशोर शाह, अजय हिंदुजा आणि योगेश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करत समाजहितासाठी अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सदस्य आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *