ग्रामीण तरुणांसाठी पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव  नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम
1 min read

ग्रामीण तरुणांसाठी पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम

Loading

ग्रामीण तरुणांसाठी पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :
नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस भरतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हरसूल पोलीस स्टेशन, नाशिक येथे पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव यशस्वीपणे घेण्यात आला. हा उपक्रम मा. वासुदेव देसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), पेठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या सराव परीक्षेला ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस भरती लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप, वेळेचे नियोजन तसेच योग्य तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी हरसूल पोलीस स्टेशनचे एपीआय गावित सर उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य केले.
मार्गदर्शन करताना डी.वाय.एस.पी. वासुदेव देसले साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास ते निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस भरतीबाबत आत्मविश्वास वाढला असून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी दिशा मिळत असल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *