विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; कै. राजेंद्र पवार यांच्या स्मरणार्थ वह्यांचे वाटप, श्रीमती पुष्पाताई पवार यांचा प्रेरणादायी उपक्रम; दरवर्षी शालेय साहित्याकरिता आर्थिक मदतीची घोषणा
![]()
विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; कै. राजेंद्र पवार यांच्या स्मरणार्थ वह्यांचे वाटप
श्रीमती पुष्पाताई पवार यांचा प्रेरणादायी उपक्रम; दरवर्षी शालेय साहित्याकरिता आर्थिक मदतीची घोषणा
अमळनेर प्रतिनिधी :
ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित वि. या. पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा (ता. अमळनेर) येथे कै. राजेंद्र चिंतामण पवार यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी जपत त्यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी श्रीमती पुष्पाताई पवार यांनी दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याकरिता ₹२,५०० इतकी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. गोरगरीब, कष्टकरी, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या खर्चातून मदतीचा हात पुढे करणारा त्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
श्रीमती पुष्पाताई पवार या विद्यालयाचे स्थानिक संचालक आदरणीय विश्वासराव विनायकराव पाटील यांच्या लहान भावजई आहेत. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल ग्राम विकास शिक्षण मंडळाचे चेअरमन आदरणीय जयंतराव पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

