निर्भय साळुंखे या ला JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल
1 min read

निर्भय साळुंखे या ला JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल

Loading

निर्भय साळुंखे या ला JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल

अमळनेर – मारवड (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी निर्भय संदीपकुमार साळुंखे JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल मिळविले आहेत. विशेष म्हणजे त्याला JEE Advanced परीक्षेत संपूर्ण भारतात दोन हजार रँक मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दिल्ली येथील आयआयटी ला नुकताच प्रवेशित झाला आहे. त्यातच निर्भय यांने पुन्हा एक यशस्वी झेप घेतली. नुकत्याच झालेल्या CET परीक्षेतही निर्भयने 99.9 पर्सेंटाइल मिळविले आहेत. आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे व स्पर्धा परीक्षा पुस्तकाच्या लेखिका मोनाली साळुंखे यांचा तो मुलगा आहे. त्याने मिळविलेले यश हे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. याच पार्श्वभूमीवर निर्भय चा विशेष सत्कार नाशिक आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे, राज्य सैनिकी शाळा असोसिएशन चे कार्यकारणी सदस्य उमेश काटे, डॉ जी. व्ही देसले, मारवड विकास मंच चे देवेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

फोटो कँप्शन
मारवड (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी निर्भय साळुंखे याचा सत्कार करताना नाशिक आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार. शेजारी आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे, उमेश काटे, डॉ जी. व्ही देसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *