पीर बाबा यात्रेनिमित्त माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतले दर्शन
![]()
पीर बाबा यात्रेनिमित्त माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतले दर्शन
सय्यद अब्दुल रज्जाक शहा बाबा दर्ग्यावर चादर अर्पण; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
धार | प्रतिनिधी
धार गावातील हजरत सय्यद अब्दुल रज्जाक शहा बाबा यांच्या पवित्र यात्रेनिमित्त अमळनेरचे लोकप्रिय माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील (आबासाहेब) यांनी दर्ग्यावर भेट देऊन चादर अर्पण केली व बाबा यांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले.
यात्रेनिमित्त दर्गा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे धार गावातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नासिर मुजावर, धारचे इमाम कैसर रजा, शौकत अली सय्यद, जाकीर शेख, शाहरुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देत यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. पीर बाबा यात्रेमुळे परिसरात धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.
धार गावातील या यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

