मारवड पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित ए.पी.आय. मन्सूरी यांचे स्वागत, एपीआय जिभाऊ पाटील यांना दिला निरोप…
![]()
मारवड पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित ए.पी.आय. मन्सूरी यांचे स्वागत,
एपीआय जिभाऊ पाटील यांना दिला निरोप…
अमळनेर – तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यातील ए.पी.आय. जिभाऊ पाटील यांची बदली धुळे येथे झाल्यानंतर त्यांच्या जागी शनीपेठ पोलिस ठाण्यातून बदलून आलेले नवनिर्वाचित ए.पी.आय. साजिद मन्सूरी यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
यावेळी धार येथील सामाजिक कार्यकर्ते अलीम मुजावर, मुन्ना मिस्त्री, मांडळ येथील ग्रामस्थ मंडळी, पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार डॉ. विलास पाटील, बाबुलाल पाटील, पोलिस कर्मचारी बांधव ग्रामस्थांनी दोघी अधिकारींचे स्वागत केले. पदभार स्विकारल्यानंतर एपीआय साजिद मन्सूरी यांनी जिभाऊ पाटील यांना जसे सहकार्य केले तसे सहकार्य मला करा अशी अपेक्षा व्यक्त केली .आपण सर्व मिळून सांमजस्याने सर्व भांडण तंटे सोडवण्यासाठी प्रयत्न करु आणि वेळेवर कायद्याचाही तेवढाच कडक वापर करू असे सत्कार प्रसंगी साजिद मन्सूरी यांनी सांगितले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार, ग्रेड पोउपनि संजय पाटील,सहाय्यक फौजदार फिरोज बागवान, संजय पाटील,दिपक पाटील,सुनिल पाटील,संजय पाटील,पोहेकाँ सुनिल आगोणे, विनोद साळी,सुनिल पाटील, शरिफखान पठाण, मुकेश साळुंखे ,भरत ईशी,भरत गायकवाड, संजय सूर्यवंशी, दिनेश पाटील,प्रविण पारधी, चापोहेकाँ संजय पाटील,धनंजय देसले,रेखा ईशी,स्मीता भाल्डे, पोलिस नाईक मिलिंद बोरसे, युनूस तडवी, पोकाळ राजेंद्र पाटील,प्रविण पाटील,हेमचंद्र साबे,विशाल मोरे,सुमित गिरासे,भावेश देवरे,आसिफ तडवी,कमलेश पाटील,परवेज शेख,माधुरी शिरसाठ,प्रियंका शिरसाठ, सायली वाघमारे, उपस्थित होते. आभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी केले.

