काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार , अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न
1 min read

काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार , अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न

Loading

काँग्रेस संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

अमळनेर येथे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. बंटी भैया पाटील, श्रीधर काका, श्री. वाणी सर तसेच चाळीसगाव काँग्रेसचे नेते श्री. नितीन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश भालेराव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमळनेर तालुक्यातील काँग्रेस संघटनेच्या कार्याचा गौरव केला. “अमळनेरची काँग्रेस संघटना जिल्ह्यात आदर्शवत काम करत आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा, जनसंपर्क आणि संघटनशक्ती यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. आगामी काळात जिल्हाभर काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. बंटी भैया पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत, “प्रदेश काँग्रेसकडून अमळनेर तालुक्याला आणि येथील कार्यकर्त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल. संघटन विस्तार आणि पक्ष बळकटीसाठी प्रदेश नेतृत्व कटिबद्ध आहे,” असे सांगितले.

यावेळी शेतकी संघ निवडणुकीत यश संपादन करणाऱ्या विजयी उमेदवारांचा गौरव करण्यात आला. तसेच संघटना मजबूत करण्याच्या हेतूने प्रतिकूल परिस्थितीतही सत्ताधारी आमदार व खासदार यांच्या विरोधात धैर्याने आणि ताकदीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचाही विशेष सत्कार करण्यात आला. नवनियुक्त NSUI जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांचाही यावेळी अभिनंदनपूर्वक सत्कार करण्यात आला.

बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा पाटील, सुरेश दादा पाटील, गोकुळ आबा पाटील, तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, प्रा. श्याम पवार, संदीप घोरपडे, किसान काँग्रेसचे प्रा. दिनेश पवार, गिरीश पाटील, प्रताप आबा, भागवत अण्णा, ताराचंद नाना, रोहिदास दाजी, श्रीराम आप्पा, भिवसन बाबा, तुकाराम बापू, प्रमोद पाटील यांच्यासह तालुक्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडून आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात सूचना केल्या. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून काँग्रेसचा झेंडा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला.

“एकजूट, संघटन आणि जनसंपर्क यांच्या बळावर अमळनेर तालुक्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा संकल्प” कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. उत्साह, आत्मविश्वास आणि नवचैतन्याने भरलेल्या वातावरणात ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *