अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान, आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा
![]()
अमळनेरच्या डॉ. हेमंत चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; तेली समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान
आमदार अनिल पाटील यांच्याकडून विशेष सत्कार; उच्च शिक्षणासाठी दिल्या शुभेच्छा
अमळनेर (प्रतिनिधी) :
अमळनेर येथील साई पापड उद्योगाचे संचालक रविंद्र चौधरी व सरला चौधरी यांचे सुपुत्र डॉ. हेमंत चौधरी यांनी एमबीबीएस पदवी संपादन करून अमळनेर तालुका व परिसरातील तेली समाजात पहिले एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विशेष सत्कार केला.
यावेळी आमदार पाटील यांनी डॉ. हेमंत चौधरी यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या आई-वडिलांचाही सन्मान केला. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. हेमंत चौधरी हे अत्यंत हुशार व अभ्यासू विद्यार्थी असून त्यांनी पालघर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते इंटर्नशिप करत असून त्यानंतर पदव्युत्तर (मास्टर) शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमळनेर येथेच वैद्यकीय सेवा देण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या सत्कार समारंभास तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, उद्योजक चंद्रकांत चौधरी, देविदास देसले, भाजपचे माजी शहराध्यक्ष शितल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, पत्रकार किरण पाटील, बाळासाहेब शिसोदे, गोविंदा बाविस्कर यांच्यासह समाजबांधव, मित्रपरिवार आणि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हेमंत चौधरी यांच्या या यशामुळे चौधरी कुटुंबासह संपूर्ण तेली समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे समाजातील तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

