फुलांच्या वर्षावात परिश्रम दिव्यांग निवासी शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , औक्षण, शालेय साहित्य व खाऊ वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
1 min read

फुलांच्या वर्षावात परिश्रम दिव्यांग निवासी शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , औक्षण, शालेय साहित्य व खाऊ वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Loading

फुलांच्या वर्षावात परिश्रम दिव्यांग निवासी शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

औक्षण, शालेय साहित्य व खाऊ वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन मनापासून स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करत आनंददायी वातावरण निर्माण केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले. तसेच विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम, खेळ आणि ॲक्टिव्हिटींचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.

प्रवेशोत्सवामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंद, उत्साह आणि नवचैतन्याने भरून गेला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि आनंद हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

“दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *