कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे शाळां शुभारंभ उत्साहात
![]()
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे शाळां शुभारंभ उत्साहात साजरा*
“””””””””””””‘”””””””””””””””””””””'”””””””””””””””””””””
*जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राम्हणवेल संचलित, कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे ” शाळां शुभारंभ प्रव़ेशोत्सव ” सन-२०२६-२७ उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी १००% हजेरी साकारण्यासाठी गाव पाड्यांवर एक आठवड्यापूर्वी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक भेटी घेत असल्या कारणाने आज दि. १५ जून २०२६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींचे शाळेत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री. माळी के. एन., शिक्षक श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी. एस., शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे उपस्थित राहून नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींचे चारचाकी वाहन सुंदर फुले ,फुगे लावून सजावट करुन त्यात विद्यार्थ्यांना बसवून ब्राम्ज्ञणवेल गावात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली. ठिक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वाहनाचे पूजन करण्यात आले. तदनंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय पटांगणात एकत्र बसवून ” शाळा शुभारंभ प्रव़ेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, शालेय स्कुल कमेटी अध्यक्ष मा. अण्णासाहेब कैलास भिका महाजन, ब्राम्हणवेल गावाच्या सरपंचा सौ. रेखाताई सुरेश देसाई, श्री. सुरेश वसंत देसाई, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंचा , सौ. रेखा सुरेश देसाई यांनी कार्यभार सांभाळला. कार्यक्रमात सुरुवातीला स्वागत गीत घेण्यात आले. तदनंतर सरस्वती प्रतिमा पुजन करण्यात आले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना नवीन शालेय पुस्तके, पेन, वह्या, बिस्किट पुडे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी व शैक्षणिक सामाजिक कार्यात झटणारे विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन. यांना राष्ट्रीय बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” देण्यात आला. म्हणून मान्यवर सरपंचा सौ. रेखा सुरेश देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी यावेळी सरांचे कौतुक करुन अभिनंदन केले. कार्यक्रमात मान्यवरांनी विविध प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे कार्य केले आहे. असा गौरवोद्गार मान्यवरांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी केले.*
✒️ हिरामण सोनवणे
(कलाशिक्षक)

