जिल्हा कोषागार अधिकारी श्री. माधवजी थैल यांचे माध्यमिक समन्वय समितीकडून स्वागत; वेतन देयकांबाबत सकारात्मक आश्वासन
![]()
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. माधवजी थैल यांचे माध्यमिक समन्वय समितीकडून स्वागत; वेतन देयकांबाबत सकारात्मक आश्वासन
जळगाव, दि. ___ : जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आदरणीय श्री. माधवजी थैल यांची माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन जळगाव जिल्ह्यात स्वागत केले.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च, एप्रिल व मे २०२६ या महिन्यांच्या प्रलंबित वेतन देयकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांना वेतनाचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी मार्च, एप्रिल, मे वेतन देयके मंजूर करून निधी संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.
श्री. माधवजी थैल यांनी या विषयावर अत्यंत सकारात्मक भूमिका घेत संबंधित बाबींचा आढावा घेतला. तसेच सोमवारी किंवा मंगळवारी प्रलंबित वेतन देयके अदा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले.
या प्रसंगी समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून डॉ. मिलिंद बागुल, समन्वयक तुळशीराम सोनवणे, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, महिला प्रतिनिधी सौ. सुनीता खडके, प्रेम झवर,सुमेध नेतकर, संजय पाचपोळ आदी उपस्थित होते.
समन्वय समितीच्या या पाठपुराव्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च एप्रिल मे 2026 वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

