शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; सरसकट कर्जमाफीची मागणी
1 min read

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; सरसकट कर्जमाफीची मागणी

Loading

जाचक अटी रद्द करा; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

अमळनेर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व शर्ती रद्द करून कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे.

तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने अमळनेर तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांतील सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे घसरलेले दर आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेतील कठोर अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असून ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्जवसुलीचीच ठरत असल्याची टीका करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने योजनेतील सर्व जाचक अटी तत्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष प्रशांत एम. निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, किसान सेल तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शहर सरचिटणीस चिंधू ओंकार वानखेडे, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष शांताराम भाऊ कोळी, तालुका उपाध्यक्ष वासुदेव मामा, दीपक जगन्नाथ पाटील (वाघोदा), पंजाबराव पाटील (अंचलवाडी) आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *