देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; ,मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक
![]()
‘देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन;
मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक
अमळनेर : “ते आले, त्यांनी पाहिले आणि येथील भक्तीभावाने व शिस्तीने त्यांचे मन जिंकून घेतले…” अशीच काहीशी प्रचिती शुक्रवार, दि .१२ जून रोजी येथील अतिप्राचीन ,अतिजागृत,अतिदुर्मिळ जागृत श्री मंगळग्रह मंदिरात पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रचंड गाजत असलेल्या “देऊळबंद २आता परीक्षा देवाची “या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अमळनेर येथे चित्रपटाचे ख्यातनाम दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे आणि निर्माते कैलासबापू वाणी आले होते. यावेळी यांनी श्री मंगळग्रह मंदिरात येऊन देवतेचे अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले.
मित्राच्या आग्रहाखातर भेट, पण व्यवस्थापनाने जिंकले मन!
मंदिरात त्यांचे अनुभव सांगताना दिग्दर्शक प्रवीण तरडे कमालीचे भावूक झाले होते. ते म्हणाले, की “अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेले माझे मित्र राजेश पांडे यांनी मला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, अमळनेरला जाऊन आमच्या श्री मंगळग्रह देवतांचे दर्शन घेतले नाही, तर पुण्यात पाय ठेवू देणार नाही! त्यांच्या याच प्रेमापोटी आणि आग्रहाखातर आम्ही इथे आलो. परंतु, मंदिरात आल्यानंतर येथील जे वातावरण पाहिले, त्याने माझे मन प्रफुल्लित झाले.मला येथे मानसिक शांतता लाभली.”
श्री.तरडे यांनी मंदिर प्रशासनाच्या शिस्तीचे तोंडभरून कौतुक केले. मंदिरातील तरुण पुजारी यांचे एकसारखे आणि नीटनेटके सोवळे, सर्व सेवेकरी-कर्मचाऱ्यांचा शिस्तबद्ध पेहराव आणि संपूर्ण मंदिर परिसरात असलेली कमालीची स्वच्छता ,हिरवळ पाहून त्यांनी विश्वस्त मंडळाचे तोंड भरून कौतुक केले . प्रवीण तरडे यांनी स्वतः मंदिरात पारंपरिक सोवळे परिधान करून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या शिस्तीचे पालन केले .’देऊळबंद २’ च्या यशासाठी प्रार्थना केली.
ग्लोबल महातेज वृत्तपत्राचे कौतुक
सामाजिक बांधिलकी : चित्रपटाच्या कमाईतून शेतकऱ्यांच्या मुलांना मदत
खानदेश चे सुपुत्र निर्माते कैलासबापू वाणी यांनी सांगितले की व्यावसायिक गणितांच्या पलीकडे जाऊन चित्रपटसृष्टीने सामाजिक भान कसे जपावे, याचा आदर्श . ‘देऊळबंद २’ या चित्रपटातून पहावयास मिळणार आहे.चित्रपटातून मिळणाऱ्या कमाईचा एक मोठा भाग हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता खर्च करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच देऊळबंद चित्रपटाचे ११ भाग येणार आणि त्यात प्रवीण तरडे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे मंदिर प्रशासन आणि उपस्थित भाविकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी मंदिर व्यवस्थापन समिती, मंदिराचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला .चित्रपटाच्या अफाट यशासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम,खजिनदार गिरीश कुलकर्णी,जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी,विश्वस्त डी.ए.सोनवणे,खा. शि. मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल,जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील ,सचिव वासू पाटील,अनुप गोरे,गजानन मालपुरे,लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष नितीन भदाणे,स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी जगदीश पाटील,महेश कोठावदे,मिंटू बारी व स्वामी समर्थ केंद्राचा परिवार,शाम पुरकर,रवी भोई (बॉडीगार्ड),रिलस्टार चेतन छावा ,पिळोदा वि.सो. चे चेअरमन विलास कुलकर्णी ,सौ.मेघा कुलकर्णी,वरूण पाटील,दर्शन पाटील,वेद पाटील,योगराज पाटील,किशोर महाजन,सनी गायकवाड,मनीष पाटील,ज्ञानदीप सांगोरे,सचिन पाटील,रोहित शिसोदे,भूषण लोहार,व मंगलसेवेकरी अनिल कदम, विनोद कदम,प्रकाश मेखा,आशिष चौधरी,गोरक्षनाथ चौधरी,मनोहर पाटील,आर.टी.पाटील,बाळा पवार, श्री मंगळग्रह मंदिर सेवेकरी व भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

