आयकेडी मॅथ्स अकॅडमीच्या पुढाकाराने १४ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य’ : विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर सेमिनार ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचा उपक्रम : करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा सन्मान
![]()
आयकेडी मॅथ्स अकॅडमीच्या पुढाकाराने १४ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य’ : विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर सेमिनार
ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचा उपक्रम : करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा सन्मान
अमळनेर प्रतिनिधी: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन सेमिनार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नर्मदा रिसॉर्ट, अमळनेर येथे संपन्न होणार आहे.
या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी तसेच इतर उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच CET, JEE, NEET परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमांची निवड आणि करिअर नियोजन यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. विद्यार्थी व पालकांना त्यांच्या शंका व प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचे निरसनही केले जाणार आहे.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचे आयोजन ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे यांनी केले असून डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी (पुणे) हे सहआयोजक आहेत. IKD Maths Academy व P.T.A., अमळनेर यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.
IKD Maths Academy चे संचालक प्रा किरण माळी सर यांनी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
संपर्क: 77670 15941 / 77670 15942
“योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य!” हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.


