किनगावचा बदनाम व मग्रूर भाडेकरू संदीप लिलाधर निंबायत – न्हावी याच्याकडून वयोवृद्ध घरमालकाचा वर्षा पासून आर्थिक व मानसिक छळ*
![]()
* *किनगावचा बदनाम व मग्रूर भाडेकरू संदीप लिलाधर निंबायत – न्हावी याच्याकडून वयोवृद्ध घरमालकाचा वर्षा पासून आर्थिक व मानसिक छळ*
* किनगाव बुद्रुक तालुका यावल येथे बस स्टॉप च्या दक्षिणेला असलेल्या ‘आत्माराम नगर ‘ डांभुर्णी रोडला ज्येष्ठ नागरिक तथा निवृत्त शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचे घर आहे. लुल्हे यांचेकडे शेतजमीन अथवा कोणताही लघुउद्योग नसल्याने उत्पन्नाचे साधन फक्त पेन्शनच आहे त्यांना दोन मुली असून त्यांचे शिक्षण व विवाह बाकी आहे. कोरोना काळात त्यांच्या वडिलांचे व बहिणीचे निधन झाले ; त्यांच्या उपचारार्थ तसेच आईच्या ऑपरेशनमुळे ते आज कर्जबाजारी आहेत. सध्या ते पिंप्राळा – जळगाव येथे राहत आहेत. त्यांनी किनगाव येथील खोली संदीप न्हावी याच्या विनंतीनुसार ऑगस्ट २४ मध्ये भाड्याने दिली. सुरुवातीला दहा हजार डिपॉझिट व चार हजार रुपये भाडे ठरवून महेंद्र नारायण महाजन यांच्या मध्यस्थीने खोली भाड्याने दिली. मात्र संदीप याने गोड बोलून , ” तुम्ही जळगावला जा दोन दिवसांनी डिपॉझिट टाकतो.” असे गोड आश्वासन दिले. डिपॉझिट तर नाहीच पण तब्बल चार महिने भाडे दिले नव्हते तरी सुद्धा माणुसकीने आणि अडचणी समजून विजय लुल्हे भाडेकरुला माणुसकीने आजतागायत वागवून घेत आहेत. महिन्याचे भाडे नियमित न देता संदीप न्हावी नेहमी अपूर्ण पैसे देत असतो. घरभाडे थकबाकीचे सांगितल्यानंतर संदीप नेहमी बायकोचे व स्वतःचे आजार , ड्रायव्हिंग लायसन्सचे कॅम्प झाले नाहीत असे खोटे बहाणे सांगून भाडे देतच नाही. मोबाईलवर विकृत हासून अरे तुरेची भाषा करतो ! आजतागायत सर्व भाडे फोन पे ने असल्याने सर्व व्यवहार पारदर्शी असूनही आता फक्त एक महिन्याचेच भाडे माझ्याकडे बाकी आहे असे संदीप ठासून खोटे बोलतो !!! वारंवार विनंती करूनही हिशोब देत नाही व हिशोब पाहतही नाही आणि भेटीवळी धमक्या देऊन अर्वाच्च्य भाषेत अपमानित करतो. लुल्हे यांच्या वृद्ध आईचे ऑप्रेशन झाले त्यामुळे सेवा सुश्रुषा करावी लागत असल्याने आईला सोडून ते वारंवार भाडे घेण्यासाठी किनगावला जाऊ शकत नाही.
हतबल झालेल्या व मनाने खचलेल्या घरमालक लुल्हे यांनी सात जानेवारी २०२६ रोजी इच्छा नसतांना यावल पोलीस स्टेशन येथे एन.सी.आर. तक्रार दाखल केली .दिवाणी कायद्याच्या कक्षा अंतर्गत पोलिसांनी संदीप याला समज दिली कडक कारवाई होत नाही याचा उलट फायदा घेऊन निर्लज्जपणे गुंड प्रवृत्तीने खोटे आश्वासने देत मजेत राहतो आणि ३३ हजार रुपये भाडे देत नाही ! ‘ हिशेब दोन मित्रांमध्ये बसून करून घेऊ ‘ अशी विनंती संदिपला केली असता तो दादागिरीने धमकावतो की, ” कुणालाही मध्यस्थीसाठी आण ; मी कुणाला घाबरत नाही ! ” संदिप पैसे बुडवण्याच्या उद्योगामुळे परिसरात नव्हे तर गावोगावच्या नातेवाईकांमध्ये कुप्रसिद्ध आहे तरी सुद्धा दरम्यान लुल्हे यांनी त्याच्या भाऊ व आईवडिलांच्या कानावर ही फसवणूक कानी टाकली तरी ते उलट त्याची पाठराखण करतात ! जळगावचे संदिपचे साले व उच्चभ्रू तथाकथित समाजसेवक यांना विनंती केली असता त्यांनीही संकुचित वृत्तीने नीतीशून्यतेचे प्रदर्शन केले ! तरीही मानवतेवर गावाशिवच्या नात्यावर भरोसा ठेवून गावातील प्रतिष्ठीत पुढारी व जुने भाडेकरू यांच्या उपस्थितीत मध्यस्थीचे प्रयत्न करून पाहिले असता संदीपने हिशेबाला बगल देत अरे तुरे करीत अपमानीत केले. बैठकीत मित्रांकडून दबाव टाकला. मी १०००० रुपये डिपॉझीट जळगावला प्रत्यक्ष दिले असा खोटा आरोप करीत मध्यस्थांची दिशाभूल करीत भाड्याचे पैसे देण्याच्या व्यवहाराला दांडगाई दाखवित फाटा दिला ! पुढारी हिशेब न बघता बोलतात आणि त्याचे शिकवलेले समानधर्मी पढवून ठेवलेल पंटर मित्र ” संदिप कडे पैसेचे नाहित तो कुठून भाडे देणार ? ” असे समर्थन गावकीच्या नात्याने करून त्याच्या दुर्वर्तनाला पाठीशी घालतात !भाडे पेलवले जात नाही तर मग हे मित्र छोटी खोली का पाहून देत नाही ? ‘ अंथरूण पाहून पाय पसरावेत ‘ यानुसार नियोजन न करता साध्या सरळ स्वभावाच्या घरमालकाला रितसर छळणे सुरू आहे….
आर्थिक अडचण असूनही भाडेकरू संदीपचा संसार कसा सुरळीत चालतो ? अन्नधान्य, किराणामाल , चहापाणी, कपडेलत्ते, प्रासंगिक आजार , विशेषतः गाडी फिरवायला पेट्रोल व रोज दारू ढोसायला अन् दैनिक खर्चासाठी पैसे कसे येतात ? मात्र फक्त खोलीचे भाडे देण्यासाठीच पैसे का नसतात ?
किनगावी जाऊन भाड्याची प्रेमळपणे मागणी केली असता सतत आर्थिक अडचणींचा खोटा पाढा धर्मपत्नी व मुलगी वाचते आणि संदिपच्या फसवणूकीवर पांघरण घालतात ! एवढेच नव्हे तर किनगावला खोलीवर भेट झाल्यावर मी बाहेरून येतो सांगून संदिप दिवसभर आम्हाला घरी बसवून ठेवतो आणि जातांना ‘ मी पंधरा मिनीटांनी येतो ‘ सांगून आम्हाला नेहमी फसवतो आणि आम्ही जळगावी पोहोचल्यावर त्याच रात्री दारू ढोसून घरमालकाला शिव्या घालतो आणि ” तू उद्या ये तुला पाहून घेतो ” अशा धमक्या देतो. प्रत्यक्ष किनगावला जाऊन येतो असे आश्वासन देऊन आम्हाला ७ महिन्यांपासून बुद्धी पुरस्कर फसवित आहे ….
[ *गुंड संदिपचे असेही महाप्रताप चालू*…..
🔰 संदिपने भाऊबंदकीची साडेचार एकर जमीन परस्पर गहाण करून लाखोचा व्यवहार दोनदा केला परंतु दोन भावांना त्यातील फुटकी कवडी न देता सर्व पैशांचा अपहार केला ! तसेच भाऊबंदकीच्या बटवाऱ्यात एकात्रित असलेली बखळ जागाही विकून पैशांचा अपहार सुद्धा करुन भावांना फसविल्याने त्यांच्यात बेबनाव आहे ….
🔰 चिंचोली ता. यावल येथील हात मजूरी करून जीवन जगणाऱ्या खंडेराव खैरे या सुस्वभावी गरीब दांम्पत्याशी घरोबा करून बहिण – पाहुण्याचे नाते लावत गोडीगुलाबीने त्यांचे कडून मुलीच्या लग्नासाठी ५०००० रुपये घेऊन गंडविलें – तब्बल ३ वर्षापासून त्यांना खोटे आश्वासन देऊन संदिप फिरवत आहे….
🔰 संदिप हा ” मोटर सायकलची लायसन्स काढून देतो , गाडीची नंबर प्लेट मिळवून देतो ” असे सांगून किनगाव परिसरातील ईचखेडा ,वाघझिरा , लंगडा आंबा येथील आदिवासी पावरा समाजाच्या आशिक्षित लोकांकडून अव्वा सव्वा पैसे घेऊन कामे न करता पैसे खाऊन संदिपचा ‘ लुटण्याचा ‘ उद्योगही परिसरात चर्चेत आहे ! गावातील मेडिकल्स दुकानावरील उधाऱ्या सुद्धा तो बुडवित आहे. कुटूंबिय व नातेवाईक त्याच्या या दुष्ट व राक्षसी वृत्तीच्या फसवणूकीवर पडदा घालत राहिले तर येत्या दिवसात संदिप त्याच्या मिठास गोड बोलण्याच्या गुणवत्तेवर कुटूंब , समाज व गावाचा नाव लौकिक धुळीस मिळवेल हे नक्की ! ]
घरमालक विजय लुल्हे जळगाव येथे राहतात.ते स्वभावाने सुसंस्कृत , सभ्य ,संयमी , निर्वव्यसनी व चारित्र्यशील असल्याने त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन भाडेकरू संदीप बुद्धी पुरस्कर अपमान आणि मानसिक छळ करून निर्लज्जपणे फुकट राहत आहे….
शक्यतो खेड्यामध्ये खोली भाड्याने देतांना करार केला जात नाही. मध्यस्थीच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि भाडेकरूच्या जाहीर आश्वासनावर भरोसा ठेवून खोली भाड्याने दिली जाते .घरमालक लुल्हे वयस्कर असल्याने ते मारामारी करणार नाहीत आणि भांडखोर नसल्यामुळे तसेच शिक्षक असल्याने गल्ली मैदान करू शकत नाही याची खात्री गुंड प्रवृत्तीच्या संदिपने मनोमन पक्की खात्री करून घेतली ! प्रेमाने घरभाडे मागितले असता , निर्लज्जपणे ” मी तुमचे पैसे बुडवून खोली सोडून चाललो का ? मी दुसरी खोली बघतो आहे ; खोली मिळाली की मी सर्व पैसे देऊन टाकेन ” असे खोटे आश्वासन देत छद्मी हास्य करून ७ महिन्यांपासून निर्लज्जपणे भावनिक छळ करीत आहे ….
विशेषतः लुल्हे यांना तेच घर विक्री करून मुलीच्या लग्नासाठी पैशांची तजवीज करायची आहे आणि गुंड प्रवृत्तीचा संदिप खोली सोडतही नाही अन् खोलीभाडे सुद्धा देत नाही या दुहेरी कचाट्यात सापडलेल्या लुल्हेंवर मानसिक परिणाम झालाय….
समाजसेवक व हितचिंतकांनी सत्यनिष्ठेने आणि निःस्वार्थीपणे गुंड प्रवृत्तीच्या संदीपला समज देऊन हिशेब पूर्ण करून खोली सोडण्याचे कामी सहकार्य करावे असे आवाहन अन्यायपिडीत भितीग्रस्त ज्येष्ठ नागरिक विजय लुल्हे यांनी केले आहे.

