फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात
1 min read

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात

Loading

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी : जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभानिमित्त खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फिफा विश्वचषकाचे प्रतीक असलेल्या फुटबॉलचे तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींमध्ये फुटबॉल खेळाबाबत जागरूकता निर्माण करण्यासह क्रीडेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक प्रचलित व लोकप्रिय खेळ असून फिफा विश्वचषक स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. या स्पर्धेतील विश्वचषक करंडक हा सुवर्णनिर्मित असून जगातील सर्वात मौल्यवान क्रीडा करंडकांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या स्पर्धेला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. खेळातून शिस्त, संघभावना, परिश्रम, जिद्द आणि पराभव स्वीकारण्याची मानसिकता विकसित होते. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे.”

कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. मनुभाऊ दीक्षित, श्रीमती जे. एल. पाटील, सौ. संजीवनी देशमुख, श्री. राजेश बिर्हाडे, श्री. प्रवीण पुरकर तसेच आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी फिफा विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करत विद्यार्थिनींना क्रीडाक्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *