फैजपुर परिसरात माती नमुने संकलित; पीक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार अहवाल
![]()
माती नमुना संकलन मोहीमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी, [फैजपुर
डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ कृषी विद्यालय विभागाच्या वतीने [फैजपुर] येथे माती नमुना संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे शेतजमिनीतील मातीचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन व पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतातून विविध ठिकाणांहून मातीचे नमुने संकलित करण्यात आले. माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची माहिती मिळून उत्पादन वाढीस मदत होते, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मातीचे प्रतिनिधिक नमुने घेण्यासाठी शेतातील विविध ठिकाणांहून माती गोळा करून प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली.
या उपक्रमात परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून माती परीक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी कन्या खुशी शिरसाट, भावना दलाल , प्रीती मराठे , चंचल पावरा , सुप्रिया पावरा, निषाद तडवी यांनी केले आहे.

