पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण
1 min read

पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

Loading

पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

जळगाव दि०५/०६/२०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजावी, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण व्हावे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री फालक, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना वृक्ष हे मानवजीवनाचे अविभाज्य घटक असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, वृक्षांचे महत्त्व त्यांना समजावे आणि निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे यासाठी विद्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारली.
पर्यावरण संरक्षण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाची सातत्यपूर्ण जीवनशैली बनली पाहिजे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे यशस्वी ठरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *