‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा
1 min read

‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा

Loading

‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा

56 महिला सायकलपटूंचा सहभाग; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’वर्ल्ड सायकल डे निमित्त सायकलिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. मेहरून तलाव चौपाटी, जळगाव येथे झालेल्या या स्पर्धांना महिला सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पोलीस विभाग तसेच माय भारत यांचे विशेष सहकार्य लाभले. जिल्हास्तरीय या स्पर्धेत 56 महिला खेळाडूंसह एकूण 58 सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. उदयसिंग पाटील, माय भारतचे अभिषेक चावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, छत्रपती पुरस्कार विजेते किशोर चौधरी, मीनल थोरात, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी कमलेश नगरकर, बी. एन. पाटील, अशोक निकम, कांचन विसपुते, शेखर पोळ, अनिल माकडे, राहुल चौधरी, समीर घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा सब-ज्युनिअर (10 ते 14 वर्षे), ज्युनिअर (15 ते 18 वर्षे) आणि इलीट (19 वर्षांवरील खुला गट) अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली.

विजेते खेळाडू

सब-ज्युनिअर गट (10 ते 14 वर्षे)

  • प्रथम : किनिशा विसपुते
  • द्वितीय : लावण्या पाटील
  • तृतीय : धनश्री नन्नवरे

ज्युनिअर गट (15 ते 18 वर्षे)

  • प्रथम : फाल्गुनी सपकाळे
  • द्वितीय : कार्तिक भोसले
  • तृतीय : कल्याणी बोरसे

इलीट गट (19 वर्षांवरील)

  • प्रथम : मोहिनी संदीप सपकाळे
  • द्वितीय : वैष्णवी मयूर सपकाळे
  • तृतीय : मानसी सचिन पाटील

विजेत्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक गटातील दोन खेळाडूंना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. सहभागी सर्व सायकलपटूंनाही प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी वैद्यकीय सुविधा, नाश्ता व जलपान व्यवस्था आदी सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. पंच व तांत्रिक समितीमध्ये कमलेश नगरकर, राजीव जाधव, शैलेश बाविस्कर, माधुरी सुरळकर, विमलकीर्ती मेढे व शुभम चव्हाण यांनी जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रदीप साखरे, कमलेश नगरकर, नरेंद्र म्हस्के, प्रवीण माळी, किरण काशीकर तसेच संघटनेचे पदाधिकारी, क्रीडाशिक्षक व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *