अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त व्हावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) भामरे परिवाराचे क्रांतिकारी पाऊल : आबासाहेब राजेंद्र वाघ [ जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार ( आर टी आय ) ]
![]()
अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !…
बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त व्हावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
भामरे परिवाराचे क्रांतिकारी पाऊल : आबासाहेब राजेंद्र वाघ [ जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार ( आर टी आय ) ]
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – धरणगाव तालुक्यातील अनोरे गावाचे तुकाराम सुकदेव महाजन यांच्या पत्नी व माळी समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रमेश व हरी तुकाराम महाजन यांच्या मातोश्री निसर्गवासी लाडकाबाई तुकाराम महाजन यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने पार पडला. सर्वप्रथम संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक समाजाची प्रार्थना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी म्हटली.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होऊन सत्यशोधक विचारांनी मार्गक्रमण करावे. शोषणमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हीच खरी तात्यासाहेब फुले व सावित्रीमाई यांना आदरांजली असेल असे प्रतिपादन पाटील यांनी केले. माजी मुख्याध्यापक एम एच चौधरी, माजी सरपंच भगवान महाजन यांनी मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाली. याप्रसंगी सर्व पित्रांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ व सत्यशोधक समाजाची दिनदर्शिका भेट देण्यात आली. भामरे परिवाराच्या माध्यमातून शेतात, परिसरात लिंब ,पिंपळ , वड या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी गावाचे मधुकर देशमुख, आर.टी. आय.चे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र वाघ, सरपंच स्वप्निल महाजन, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, वि का सो चेअरमन ज्ञानदेव पाटील, रमेश गुरुजी, लक्ष्मण महाजन, पत्रकार कल्पेश महाजन, राजेंद्र महाजन, जितेंद्र महाजन, मनोहर महाजन, भगवान महाजन, दगा महाजन यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

