धरणगांव शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा !.. , काँ.गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या १०० पुस्तकाचे वितरण !…
1 min read

धरणगांव शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा !.. , काँ.गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या १०० पुस्तकाचे वितरण !…

Loading

धरणगांव शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा !..

काँ.गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या १०० पुस्तकाचे वितरण !…

धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील

धरणगांव : धरणगाव शहरात संविधान जागर अभियान व सत्यशोधक समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जुन शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी केले.


मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक , रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संविधान जागर अभियानाचे कार्यकर्ते सुनील सोनार यांच्या माध्यमातून गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या १०० पुस्तकांसह महापुरुषांच्या जीवनाविषयीचे महत्त्वपूर्ण पत्रक वितरण करण्यात आले. सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सदरील पुस्तक व पत्रक सर्वांनी वाचावे व आपल्या कुटुंबात, नातेवाईक परिवारात त्याचे सामुदायिक वाचन करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष व्ही टी माळी, काँग्रेसचे नेते महेश पवार, किरण मराठे, सलीम बेलदार, राजु धनगर, नंदु धनगर, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, आर टी आय चे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रा.आकाश बिवाल, सुरज वाघरे, एच डी माळी, सागर महाले, नामदेव मराठे, समाधान महाजन, रवी महाजन तसेच शहरातील युवक – युवती व सर्व समाज बांधव बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *