एक झाड, एक संकल्प’चा संदेश; फरांदे पार्क येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा,  आमदार बालाजीराव कल्याणकर व अनिता दिदी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा जागर
1 min read

एक झाड, एक संकल्प’चा संदेश; फरांदे पार्क येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा, आमदार बालाजीराव कल्याणकर व अनिता दिदी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा जागर

Loading

एक झाड, एक संकल्प’चा संदेश; फरांदे पार्क येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा

आमदार बालाजीराव कल्याणकर व अनिता दिदी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा जागर

नांदेड प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फरांदे पार्क येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच वृक्षांचे संगोपन करण्याची आणि दरवर्षी अधिकाधिक वृक्षारोपण करण्याची सामूहिक शपथ उपस्थितांनी घेतली.
हा कार्यक्रम ब्रह्माकुमारी प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क, वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड आणि हनुमान मंदिर कमिटी, फरांदे पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला आमदार बालाजीराव कल्याणकर, ब्रह्माकुमारी अनिता दिदी, विठ्ठलराव पावडे, पंचायत समिती नांदेडचे गटविकास अधिकारी (BDO) प्रवीण सुरडकर, कृषी विस्तार अधिकारी कांबळे, हरित अभियान व वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोषराव मुगटकर, वडजे काका यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमात बी.के. योगिनी बहन, बी.के. सुनील देशमुख भाई, बी.के. निळकंठ जाधव भाई, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे, वसंत कराळे, डॉ. रुपाली माने, डॉ. येवलीकर मॅडम, मायराळ मॅडम तसेच हनुमान मंदिर कमिटीचे पदाधिकारी, ब्रह्माकुमारी परिवारातील सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजात जागरूकता निर्माण करणारा ठरला असून उपस्थितांनी भविष्यातही अशा उपक्रमांना सक्रिय सहभाग देण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *