ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट*
1 min read

ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट*

Loading

ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट*

पारोळा -अमळनेर जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सतीश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत ग्रंथालयाच्या विविध मागण्यांसाठी चर्चा केली होती .या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आमदार सत्यजित तांबे यांनी श्री सतीश पाटील यांना तातडीने मुंबईला येण्यास सांगितले. ग्रंथालयाचे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी थेट चर्चा करून निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांना सादर करण्यात आलेले निवेदन शिष्टमंडळास चर्चा व निर्णय घेण्यासाठी पुढील तारीख देण्याचा आदेश माननीय मंत्री यांनी दिले.

त्यानुसार सदर शिष्ट मंडळात सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री सतीश पाटील, श्री सदाशिव बेडगे अध्यक्ष कर्मचारी परिषद,व्यवस्थापक श्री सागर भगुरे , संचालक गणेश देशमुख ,बागुल सर यांनी मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर कर्मचारी यांच्या विविध मागण्यां बाबत निवेदन देण्यात आले . दर्जाबदल नवीन मान्यता यावर चर्चा करून माननीय मंत्री यांनी या मागण्यावर लवकर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

ग्रंथालयाच्या प्रमुख मागण्या –
1) 40% अनुदान वाढिला कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊन तथा शासन निर्णय काढावा .
२) ग्रंथालय अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करावी
3) कर्मचारी यांना किमान वेतन व दरवर्षी 10 टक्के वाढ करण्यात यावी.
४) ग्रंथालयाचा दर्जा किंवा वर्ग बदल करणे.
5) नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे.
अशा विविध मागण्यांवर सविस्तर निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *