अमळनेरात शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साधणार शिवसैनिकांशी थेट संवाद  ६ जून रोजी हॉटेल मिडटाऊन येथे तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त मेळावा
1 min read

अमळनेरात शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साधणार शिवसैनिकांशी थेट संवाद ६ जून रोजी हॉटेल मिडटाऊन येथे तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त मेळावा

Loading

अमळनेरात शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साधणार शिवसैनिकांशी थेट संवाद

६ जून रोजी हॉटेल मिडटाऊन येथे तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त मेळावा

अमळनेर प्रतिनिधी
शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विधानसभा निहाय ‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.

अमळनेर येथील हॉटेल मिडटाऊन येथे अमळनेर, जळगाव ग्रामीण आणि चोपडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त शिवसंवाद कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला राज्य व जिल्हास्तरीय शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे, शिवसेना संपर्कमंत्री (धुळे) भाऊसाहेब चौधरी, विभागीय सचिव आनंद परांजपे, माजी खासदार व जळगाव संपर्कप्रमुख आ. दिलीप मामा लांडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिवसंवाद दौऱ्यामध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून, शिवसैनिकांशी थेट संवाद साधत संघटनात्मक कार्य, प्रलंबित विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *