अतिरिक्त शिक्षकांना महानगरपालिकेत कायम सामावून घेण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग , अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट,  भेटीनंतर कार्यवाहीला वेग  शिक्षण उपसंचालकांनी मागितले मुंबई मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचे अभिप्राय
1 min read

अतिरिक्त शिक्षकांना महानगरपालिकेत कायम सामावून घेण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग , अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट, भेटीनंतर कार्यवाहीला वेग शिक्षण उपसंचालकांनी मागितले मुंबई मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचे अभिप्राय

Loading

अतिरिक्त शिक्षकांना महानगरपालिकेत कायम सामावून घेण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग

अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट

भेटीनंतर कार्यवाहीला वेग

शिक्षण उपसंचालकांनी मागितले मुंबई मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचे अभिप्राय

मुंबई (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवरती अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा या मागणीसाठी आज सकाळी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत चर्चा केली
या चर्चेनंतर लागलीच शिक्षण उपसंचालकांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबत लेखी अभिप्राय तात्काळ सादर करण्याचे आदेश काढले.

मुंबई विभागातील उत्तर पश्चिम व दक्षिण विभागामध्ये अतिरिक्त शिक्षक मोठ्या प्रमाणावर असल्याने शिक्षण उपसंचालकांनी विभागस्तरावर शिक्षक समायोजनाचे आदेश काढले आहे यामुळे मुंबईतील शिक्षक मुंबई बाहेर ठाणे रायगड व पालघर या जिल्ह्यांमध्ये फेकला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे
अनिल बोरनारे यांनी मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच व्हावे यासाठी आतापर्यंत शिक्षणमंत्री दादा भुसे शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर माहिती-तंत्रज्ञान व पालकमंत्री आशिष शेलार यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना निवेदनं दिली आहे

कोट
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामधील मुद्दा क्र. ०३ (०२) (ii) अन्वये अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करतांना रिक्त जागा समान अनुदान प्रकारावरील शाळेत नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेत जिल्हा परिषद / महानगरपालिका / नगरपालिका/कटक मंडळे या क्रमाने करण्यात यावे असे नमूद आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त असून या रिक्त जागी शिक्षकांचे समायोजन केल्यास मुंबई मनपातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी होणारे शैक्षणिक नुकसान दूर होईल
अनिल बोरनारे
अध्यक्ष
शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग
निमंत्रित सदस्य
प्रदेश कार्यकारणी भाजपा महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *