गटचर्चेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश; यावल येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात
1 min read

गटचर्चेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश; यावल येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Loading

गटचर्चेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश; यावल येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात

यावल प्रतिनिधी :
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत यावल येथे “Demonstration of Organization of a Group Discussion” या विषयावर प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेतकरी, ग्रामस्थ आणि युवकांमध्ये प्रभावी संवाद, नेतृत्वगुण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गटचर्चेचे नियोजन, विषयांची निवड, सहभागी सदस्यांच्या भूमिका, चर्चेचे प्रभावी संचालन तसेच गटचर्चेद्वारे समस्या निराकरणाच्या विविध पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कृषी, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर विचारमंथन केले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागात सामूहिक चर्चेचे महत्त्व अधोरेखित झाले. कोणत्याही समस्येवर सकारात्मक आणि परिणामकारक तोडगा काढण्यासाठी गटचर्चा हे प्रभावी साधन ठरू शकते, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. तसेच संवादकौशल्य, नेतृत्व क्षमता आणि संघभावना विकसित करण्यासाठी गटचर्चेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलेश सदार तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. कार्तिक खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पावबा खंडू पानपाटील, मयुरेश संजय पाटील, गणेश विनोद पाटील, अजिंक्य पाटील, जयेश खांगर आणि अन्सारी साद फैज यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला.

कार्यक्रमास गावातील शेतकरी, नागरिक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागात अशा ज्ञानवर्धक आणि उपयुक्त उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *