गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोटरीची साथ; वह्यावाटप व पदग्रहण सोहळा उत्साहात
1 min read

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोटरीची साथ; वह्यावाटप व पदग्रहण सोहळा उत्साहात

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; रोटरी इंट्रॅक्ट क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा*

जळगाव दि. १७/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव तसेच रोटरी इंट्रॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू वीस विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब जळगावचे श्री. निपून बजाज व श्री. अंकुश बढेर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात विद्यालयाच्या रोटरी इंट्रॅक्ट क्लबच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही उत्साहात पार पडला. इयत्ता नववीतील केतन गिरीश पाटील यांनी अध्यक्षपदाची, कु. रिया महेश पाटील यांनी उपाध्यक्षपदाची, तर कु. मृणाल सुरवाडे यांनी सचिवपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. नव्या पदाधिकाऱ्यांनी सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यालयाचे व रोटरी इंट्रॅक्ट क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या रोटरी इंट्रॅक्ट क्लबचे समन्वयक श्री. महेंद्र मिरकुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब जळगाव, रोटरी इंट्रॅक्ट क्लब तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *