नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर दिल्लीकडे युवकांची कूच; , जळगावातून ३३०० जणांचा सहभाग ‘जनतेच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतरवर आवाज बुलंद करू’; संदीप घोरपडे यांची भूमिका
![]()
नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर दिल्लीकडे युवकांची कूच;
जळगावातून ३३०० जणांचा सहभाग
‘जनतेच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतरवर आवाज बुलंद करू’; संदीप घोरपडे यांची भूमिका
अमळनेर प्रतिनिधी
या देशात मागील दशकात शेतकरी नागावला जातोय मात्र त्या विरोधात शेतकऱ्याने आंदोलन केले की शेतकरी नेते दहशतवादी ठरतात तसेच देश विघातक कार्यामध्ये त्यांना लोटून त्यांना आंदोलन जीवी म्हणून हिणवले जाते शेतकरी हा या देशाचा आर्थिक कणा आहे हा देश शेतीप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो परंतु शेती अधिक नुकसानदायक होईल अशा प्रकारे धोरण आखली जातात व धन दांडग्यांना लाभ होईल अशा प्रकारे शेतीमाल आयात अथवा निर्यात केला जातो सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याला देशोधडीला लावून संपूर्ण देश फक्त आपल्या दोन मित्रांच्या झोळीत टाकण्याचे पाप कर्म या देशातील नेतृत्व करीत आहे आणि म्हणून शेतकरी राजा जागा व्हावा त्याला जाणीव व्हावी त्याचे कुटुंब सुखा समाधानाने जगावे यासाठी काही झुरळांनी पुढाकार घेतला त्याला प्रतिसाद म्हणून जळगाव जिल्ह्यातून नवयुवकांचे झुरळांचे थवेच्या थवे दिल्लीच्या दिशेने निघाले यात नवल काय
या देशातील महिलांना असुरक्षेच्या भावनेने घेरलंय कारण या देशातील बलात्कारी तुरुंगातून बाहेर येतात आणि सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना हार घालून सन्मान देतात मिरवणूक काढून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न करतात एवढेच नव्हे तर भारत देशातील सत्ताधारी पक्षातील खासदार कुस्तीगीर महासंघाचा अध्यक्ष हा महिला कुस्तीपटू यांचे लैंगिक शोषण अत्यंत धाडसी पणे वर्षानुवर्ष करीत असताना त्या विरोधात आवाज उठविणाऱ्या विनेश फोगाट आणि साक्षी मलिक आपल्या सोबत 400 महिला खेळाडूंना सोबत घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर धरणे धरतात महिना दोन महिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अचानक एका रात्रीतून त्यांना फरपटत तिथून उठविले जाते व त्यांनाच दोषी धरून त्यांच्यावर खटले दाखल होतात यातून अनेक लिंग पिसाटांचे मनोधैर्य वाढत आहे आणि महिला मात्र भयभीत होऊन मोठ्या आशेने काही झुरळांकडे पाहत आहेत त्यामुळे मोठ्या अपेक्षेने जळगाव जिल्ह्यातून अनेक झुरळांनी दिल्लीकडे कूच केले आहे त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा सामान्य जनता करत आहे
या झुरळांना निमित्त मिळाले ते नीट परीक्षेतील पेपर फुटीने परंतु या नीट परीक्षेतीलच गलथानपणा पुढे आला असे नव्हे याप्रकारे सीबीएससी समवेत देशभरातील अनेक परीक्षांनी कोट्यावधी परीक्षार्थी या पेपर माफी यांनी खड्ड्यात लोटले व ही बाब लक्षात आल्यावर देखील सत्ताधारी संबंधितांना कोणत्याही प्रकारे दंडित करीत नाहीत अथवा केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देखील देत नाही आणि अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मंत्री अथवा लोकप्रतिनिधी आपल्या खात्यात विविध प्रकारे गैरप्रकार करताना आढळले तरी देखील त्यांना साधी समज देखील देण्यात येत नाही व या देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी या देशात शिक्षण व्यवस्था चांगली चालवण्यासाठी देशभरातील युवक प्रश्न विचारतो मात्र अशा प्रश्न विचारणाऱ्या युवकांना देशद्रोही म्हणून हिणवल्या जाते किंवा नकारात्मक विचारांचा प्रणेता म्हणून नाकारला जातो एकूणच या देशातील भांडवलशाही भक्कम होत आहे सामान्य नागरिक हवालदिल होताना त्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपापले घर भरण्यासाठी सरसावले आहेत हा देश सर्वांगाने पोखरला जातोय इंग्रजांपेक्षा अधिक वेगाने या देशाची लूट काही उद्योगपती करीत आहेत त्या उद्योगपतींनी सरकार आपल्या दावणीला बांधून ठेवलंय त्यामुळे या सरकारला आपण नागरिकांप्रती सदभाव ठेवावा त्यांच्या अडीअडचणीला मदत करावी त्यांच्या मागणीला प्रतिसाद द्यावा असे वाटत नाही आणि म्हणून या देशाचा जाज्वल्य इतिहास ज्या तरुणांनी आपल्या नजरे खालून घातलाय आणि त्यांनी आवाज उठविल्यावर सरकार विरोधात न्याय भूमिका घेण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा युवकांना कॉकरोच म्हणून अतिशय हिडीसपणे झिडकारतात तेव्हाच अल्पावधीत हे सारे झेडकारलेले नाकारलेले दुर्लक्ष केले असे सारे झुरळ क्षीणपणे का असेना आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतात त्या प्रित्यर्थ सहा जूनला त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत शांतपणे अहिंसकपणे एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला त्या अंतर्गतच जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ 3300 युवक दिल्लीकडे आपला देश वाचविण्यासाठी निघालेत त्यांना नक्कीच यश मिळेल अशी खात्री वाटते कॉक्रोज पार्टीच्या या तीन प्रवक्त्यांना 3300 युवकांनी प्रतिसाद दिला याचा प्रवाह वाढता होऊन तेहतीस कोटी जनता त्यांना या कार्यात सहभाग घेऊन सहकार्य करेल असे दिसते

