भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार
1 min read

भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार

Loading

भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार

लासूर, ता. चोपडा (प्रतिनिधी) : लासूर येथील मा.श्री. गुणवंत सिताराम माळी यांचे सुपुत्र चि. पूर्वेश गुणवंत माळी यांची भारतीय नौदलात (Indian Navy) मेडिकल असिस्टंट पदावर निवड झाल्याबद्दल महाकाल गृप, लासूर यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

पूर्वेश माळी यांनी अथक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलासारख्या प्रतिष्ठित सेवेत स्थान मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे लासूर गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी महाकाल गृपच्या पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी पूर्वेश माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. युवकांनी स्पर्धा परीक्षा व संरक्षण दलातील करिअरकडे वळावे, यासाठी पूर्वेश यांचे यश प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
पूर्वेश माळी यांच्या या यशाबद्दल त्यांचे पालक, कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या भावी सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए. के. गंभीर सर, नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटी चे माजी व्हा. चेअरमन किशोर माळी सर, श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, महाकाल गृप चे अध्यक्ष पवन महाजन, उपाध्यक्ष साहेबराव मगरे, सचिव अमोल गंभीर, खजिनदार निलेश राजकुळे, सदस्य भुमेश्वर मगरे, प्रेमराज शेलकर, आर डी महाजन, नितीन माळी, महेंद्र माळी, समाधान महाजन,विनोद मगरे, महेश माळी, योगेश माळी,मनोज महाजन आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन
भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड झाल्याबद्दल चि. पूर्वेश गुणवंत माळी यांचा महाकाल गृप, लासूर यांच्या वतीने सत्कार करताना मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *